वायरी भूतनाथ गावात उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश ; प्रवेशकर्त्यांत युवकांचा मोठा समावेश

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात उबाठा कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थानी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. प्रवेश कर्त्यांमध्ये युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह तालुका मंडल अध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर व पदाधिकाऱ्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या पक्षात तुम्ही आता प्रवेश केला आहे. १९९२ पासून मी या मतदार संघात काम करत आहे. देवबाग आणि वायरी भूतनाथ मतदार संघ हा नेहमीच आमचे नेते नारायण राणे साहेबांचा जवळचा राहिला आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील भारतीय जनता पक्ष नेहमीच येथील नागरिकांसोबत राहणार आहे, असे ते म्हणाले.

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आज आपण पाहत आहोत, विकास आणि रोजगारासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे. अनेक विकासात्मक प्रकल्प, विकासकामे ठिकठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणी होऊ घातली आहेत. भारतीय जनता पार्टीने तळागाळात काम केले असल्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत आपण विजय संपादन केला. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान महत्वाचे आहे, असे सांगून भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचेच त्यांनी स्वागत केले.

शहर अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्यामुळे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य आपण घेऊ शकलो. येणाऱ्या काळात युवा आणि महिला मोर्चावर आपणास काम करावयाचे आहे. याठिकाणीं अनेक समस्या होत्या. या समस्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्याचे ते म्हणाले. तर महेश मांजरेकर यांनी नवनियुक्त बूथ अध्यक्षांना मार्गदर्शन करताना जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे काम कसे पोहोचेल याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे सांगून आपल्या बूथ मधील सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बूथ अध्यक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. 

या पक्ष प्रवेशाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, पंकज सादये, देवानंद लोकेगावकर, रवींद्र खानविलकर, संदीप बोडवे, सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, मिलिंद झाड, शाम झाड, मनोज झाड, पूजा झाड आदी उपस्थित होते. यावेळी समीर पाटकर, लिलाधर झाड, जगदीश वेंगुर्लेकर, चिन्मय आचरेकर, मंदार झाड, हेमंत वस्त, यतीन मालवणकर, विनोद नांदोसकर, मुकेश आचरेकर, संजय वस्त, सुशांत सुर्वे, सुनील वेंगुर्लेकर, दीपेश नांदोसकर, मैथिली टिकम, शुभम चिंदरकर, अमित पालकर, निखिल साळवी, चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

error: Content is protected !!