आ. निलेश राणेंची “एक्स” पोस्ट ; शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वाळू व्यवसायिक यांचं कधी नव्हे तेवढं आर्थिक नुकसान
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं असून जिल्ह्यातील शेतकरी बागायत दारांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनता शासनाच्या मदतीची आशेने वाट पहात आहे, अशी भावना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या “एक्स” पोस्ट मधून व्यक्त केली आहे.
लांबलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वाळू व्यवसायिक यांचं कधी नव्हे तेवढं आर्थिक नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यात सगळ्या स्तरावर आर्थिक नुकसान बऱ्यापैकी झालेले आहे, शासनाने आता लक्ष दिलं नाही तर कधीच ही घडी बसणार नाही. निवडणुका येतील आणि जातील पण आर्थिक घडी एकदा विस्कटली तर ती बसवायला अनेक वर्ष जातात. शासन आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय मदत करते हे सिंधुदुर्गातील जनता आशेने वाट पाहत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.