शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख पदी मधुरा तुळसकर

मालवण : शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुखपदी मधुरा तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी ही नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना मालवण तालुका प्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, संजय पडते, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!