मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाच्या वतीने गाबित समाजातील मुलांना वह्या- दप्तर वाटप
मालवण : मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने देवबाग येथील पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. तसेच गरीब व हुशार पाच मुलांना लॅपटॉप दप्तर देण्यात आली.
यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर म्हणाले, संस्था प्रतीवर्षी वाढदिवस साजरा करत असते. यावेळी संस्थेने ठेवलेल्या ठेवी मधून आलेल्या व्याजाची रक्कम वापरून दहावी, बारावी, पदवीधर मुलांना प्रोत्साहनपर दिली जाते आणि त्यांचा यथोचित सन्मान होतो. त्यामुळे सर्वांनी भरपूर अभ्यास करून मोठे व्हावे. वकील, डॉक्टर, आयपीएस अधिकारी बनून आपल्या आई वडील , गावाचं, समाजाचं नाव उज्वल करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला देवबाग ग्रामपंचायत कर्मचारी दादा दातोस्कर, तुळशीदास कासवकर, पपू कूर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी कोळब ते सर्जेकोट येथील मुलांना संस्थेने वह्या, दप्तर मोफत वाटप केले होते.