किल्ले सिद्धगड येथे मालवण भाजपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती

मालवण : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील ओवळीये येथील किल्ले सिद्धगड येथे शिवराज्याभिषेक दिन शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी किल्ल्यावर छत्रपतींचा भगवा ध्वज फडकवत महाराजांच्या जयजयकाराने सिद्धगड परिसर दुमदुमला.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी छत्रपतींच्या दुर्गम, दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे महत्व आणि त्याचे संवर्धन यासाठी भाजपा पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्या माध्यमातून परिसराचा विकास सुद्धा शक्य आहे. किल्ल्याची सुरक्षा तथा संवर्धन याबाबत विशेष अधोरेखित करताना, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायणराव राणे, आमदार निलेश राणे, मंत्री आशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना याबाबत माहिती दिली जाईल व या किल्ल्यासाठी विकासाची दिशा निश्चित केली जाईल असे स्पष्ट केले. तर ओवळीये सरपंच रंजना पडवळ यांना सिद्धगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला. त्यामुळे राज्याच्या पटलावर किल्ले सिद्धगडचे नांव ठळकपणे येत असल्याचा आनंद व्यक्त केला.

यावेळी भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र चव्हाण, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, रामगड सरपंच शुभम मठकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, अरुण मेस्त्री, उद्योजक बाबा आंगणे, बंडू गावडे तसेच किल्ले सिद्धगड सरदार वंशज बाळा सावंत, विविध शिवप्रेमी, बाल शिवाजीची वेषभूषा केलेले बालक आणि ओवळीये व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!