विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट

दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’

वेंगुर्ला | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या आनंद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा ज्येष्ठ नेते राजू राऊळ, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह विविध तालुक्यांचे प्रभारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यात्रेत भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक शामसुंदर लोक, सुनील तांबे व प्रकाश वाघ यांचीही उपस्थिती होती. तसेच साईप्रसाद भोई, मुकुंद तोरसकर, वृषभ तोरसकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभावाची अनोखी भेट ठरला आहे. श्रद्धा, आनंद आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही देवदर्शन यात्रा सर्व सहभागी दिव्यांग बांधवांसाठी सुखकर, आनंददायी आणि मंगलमय ठरो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

error: Content is protected !!