प्रभाग २ मधून उमेश मांजरेकर, अनिता गिरकर तर प्रभाग ३ मधून उमेश चव्हाण यांचे नामनिर्देशन ; माजी आ. वैभव नाईक उपस्थित
मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ठाकरे शिवसेनेने जोरदार तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. यात प्रभाग २ मधून उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर तर प्रभाग ३ मधून उमेश अरविंद चव्हाण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. २- अ या सर्वसाधारण आरक्षण असलेल्या जागेवर ठाकरे शिवसेनेतर्फे उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर २- ब या जागेसाठी अनिता गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्हीही उमेदवारांनी आज नगरपालिकेत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी वं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. तर यानंतर प्रभाग क्र. ३ अ या सर्वसाधारण राखीव जागेसाठी उमेश अरविंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.