मनसेच्या वतीने मालवण बंदर जेटीवर खुल्या गरबा ; आकर्षक पारितोषिके
दसऱ्या निमित्ताने 5 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम ; दांडिया गरबा आणि वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
5 ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी मालवण वासीयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून भव्य खुल्या गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी मालवण बंदर जेटी वर गरबा भरविण्यासाठी जागेसाठी परवानगी साठी अर्ज मंगळवारी सादर केला. बंदर विभागाकडून देखील या उपक्रमास परवानगी दिली गेली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदिप लाड, सर्जेकोट शाखाध्यक्ष वैभव आजगावकर, सिद्धेश परब, गणेश गावडे आदी उपस्थित होते. ही भव्य खुली गरबा सर्व मालवणवासीय, लहान मुले, तरुण-तरुणींना तसेच वृद्धांना खुल्या गरबा खेळण्यासाठी आयोजित केली आहे. तसेच यातील सहभागी व्यक्तींमधून उत्कृष्ट व्यक्तींना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर या स्पर्धे दरम्यान विशेष आकर्षण म्हणून सांघिक रास दांडिया गरबा नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे. तरी मालवण वासीयांनी मोठ्या संख्येने या गरब्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.