अभिमानास्पद | सिंधुदुर्ग कॉलेज मधील एनसीसी विभागाच्या विनायक मानवर याची नौदलात निवड 

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तसेच टी. वाय. बी. एसी. या वर्गात शिक्षण शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली आहे. 

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत त्याला गेली चार वर्ष मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक मानवर याने NCC आर्मी विंग मधून शिक्षण घेतले. त्याची नौदलात झालेली निवड सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मालवण तालुक्यासाठी तसेच कृ. सी.  देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  स का  पाटील कॉलेज मालवण एनसीसी विभाग आणि  58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. मल्लेश खोत, कॉलेजचे प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे , सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदू देसाई यांच्यासह सर्व संचालक, 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, लेफ्टनंट कर्नल मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर,  सुभेदार दिनेश गेडाम तसेच अन्य पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.  

विनायक अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा आहे. विनायक सुद्धा कॉलेज करत असताना अनेक ठिकाणी काम करून तो कॉलेज करत होता त्याने कॉलेजच्या एनसीसीचा सीनियर अंडर ऑफिसर म्हणून काम केलेले आहे. कॉलेजमध्ये अनेक ऍक्टिव्हिटी त्याने राबवलेले आहेत एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी, मेहनती मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. ओरिसा या ठिकाणी त्याने चार महिन्याचे बेसिक ट्रेनिंग पूर्ण केले आहे. एनसीसी  ही कॉलेज जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे एनसीसी मुळे आपल्याला एक शिस्त निर्माण होते, एनसीसी मुळे आर्मी ,नेव्ही एअर फोर्स मध्ये नोकरीच्या संधी आहेत. रिलायन्स व इतर अनेक खाजगी उद्योगांमध्ये सुद्धा एनसीसी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. तटरक्षक दल ,पोलीस, बॉर्डर पोलीस फोर्स , अशा अनेक ठिकाणी NCC विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत. एनसीसी हा कोर्स आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच इतर कोणताही कोर्स करत असताना कॉलेज करत असताना कोणत्याही  विद्यार्थ्याला करता येतो. आठवड्यातून फक्त  4 तास वेळ द्यावा लागतो. एनसीसी मुळे आपले करिअर घडू शकते .एकंदरीत एनसीसी मध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत . आणि त्यासाठी मालवण तालुक्यातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज शिक्षण घेत असताना एनसीसी मध्ये प्रवेश घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास ,समाजाचा विकास आणि देशाचा विकास करावा त्याचबरोबर  देश सेवेला हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. मल्लेश आर खोत यांनी केले आहे.

error: Content is protected !!