पडद्याआड राहून श्रावण गावची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांची पोलिस व निवडणूक विभागाकडे तक्रार करणार : सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मांडली भुमिका


आडवली मालडी मतदार संघातील सुज्ञ जनता बदनामीचे उत्तर मतपेटीतून देणार : महायुतीच्या उमेदवार सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा विजय बहुमतांनी निश्चित करणार
मालवण : मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्याच माध्यमातून विकास हा दृष्टिकोन ठेऊन शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा विजय जनतेनेच निश्चित केला आहे. विरोधी उबाठा गटाला प्रचारात कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने समोर फक्त आणि फक्त पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे खोटे तथ्यहीन मॅसेज सोशल मीडियात पसरवण्याचे काम त्यांनी सुरु आहे. मात्र, आमच्या मतदार संघातील जनता सुज्ञ असून मतपेटीतून याचे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
श्रावण गावचा जलजीवन मिशन योजने संदर्भात जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न उबाठा गटाची मंडळी पडद्याआड राहून करत आहेत. या समाजविघातक व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मॅसेज पाठविण्याचे प्रकार करत आहेत. मात्र, अशा पद्धतीने खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे मॅसेज पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस आणि निवडणूक विभागाची नजर असून योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
श्रावण गावच्या जलजीवन मिशन कामासाठी 4 वर्षांपूर्वी काही अंशी निधी शासनाकडून मंजूर झाला. त्यातून गवळीवाडी, परबवाडी, नदीवाडी, खालची परब वाडी, या योजना पूर्ण झाल्या असून चालू स्थितीत आहेत. ग्रामस्थ पाण्याचा वापर करत आहेत. गावातील उर्वरित सडेवाडी या योजनेचे काम पूर्ण झाले असून विज वितरणकडून विज कनेक्शन मिळणे बाकी असल्याने हे काम अंतिम स्थितीत थांबले आहे. उर्वरित निधी प्राप्त झाला नाही तरीही दळवीघाडी वाडी विहीर पूर्ण झालेली असून काही काम थांबले आहे.
मुळात चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार होते. वैभव नाईक त्यावेळी आमदार असताना निधी आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. अशाप्रकारे अनेक गावात कोणताच विकास न झाल्याने वैभव नाईक यांच्या विरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. उबाठाच्या उमेदवारांनाही प्रचारादरम्यान ग्रामस्थ जाब विचारत असून उमेदवारांची बोलती बंद होत आहे. त्यामुळे उबाठा उमेदवारांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महायुतीच्या विरोधात तसेच माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अश्या प्रकारे श्रावण गावची बदनामी करणाऱ्या समाज कंटकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी श्रावण ग्रामस्थ व सरपंच यांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे. सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, सदस्य लक्ष्मीकांत मुद्राळे, सौ. हर्षदा चव्हाण, माजी सरपंच प्रशांत परब, ग्रामस्थ शिवाराम परब व अन्य ग्रामस्थ यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात संपूर्ण जिल्ह्याप्रमाणे महायुतीला पोषक वातावरण आहे. महायुतीच्या सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने निश्चित आहे, असा विश्वास मतदार संघातील ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त होत आहे

Subscribe to my channel




