राणेंच्या अटकेचे वॉरंट नाही ; प्रमोद जठार यांची माहिती
ऑर्डर दाखवा, राणेसाहेब स्वतः पोलिसांच्या गाडीत जाऊन बसतील
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी संगमेश्वर येथे पोलीस पोहोचले असले तरी या पोलिसांकडे अटकेसाठी कोणतेही वॉरंट नसल्याची माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.
दरम्यान, नारायण राणेंच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली आहे. हे सरकार दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप देखील प्रमोद जठार यांनी केला आहे.