सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सन २०२६ च्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, धनत्रयोदशीनिमित्त ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शासनाच्या राजशिष्टाचार विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे. याबाबत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीतील अनुक्रमांक ३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
हा बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुट्टीच्या सुधारित तारखेची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.