निलेश राणेंच्या माध्यमातून आपत्कालीन ग्रुपला रेस्क्यू व्हॅन ; उद्या लोकार्पण

मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील आपत्कालीन व्यवस्थापन व्यवस्थेतील अग्रगण्य असलेल्या मालवण आपत्कालीन ग्रुपला वाहतुकीसाठी आवश्यक असणारी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरुवारी ३० सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वा. भाजपा कार्यालय मालवण येथे निलेश राणेंच्या हस्ते ही गाडी हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

ही रेस्क्यू व्हॅन शासनाकडे मागणी करूनही उपलब्य होत नव्हती. चिपळूणच्या पुर परिस्थितीत मदतीला जाण्यासाठी आवश्यक रेस्क्यू व्हॅन न मिळाल्याने जाण्यास वेळ झाला यांची खंत दामोदर तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी ताबोडतोब टाटा कंपनीची रेस्क्यू व्हॅन स्वखर्चाने बुक करून उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त देशात सेवा सप्ताह सुरु आहे. याचे औचित्य साधून गुरुवारी सायंकाळी या रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, भाजप गटनेते गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, बाबा परब व अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती प्रभारी शहराध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3847

Leave a Reply

error: Content is protected !!