प्रभाग ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सव्वा दोन कोटींची विकासकामे

सत्ता कोणाचीही असो सततच्या पाठपुराव्यामुळे मागील १५ वर्षात प्रभागातील विकास कामांचा आलेख चढताच : पूजा करलकर

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सन २०१६ ते २०२१ या कालावधीत तब्बल सव्वा दोन कोटींची विकास कामे मार्गी लागली आहेत. सत्ता कुणाचीही असो, नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असो, सततच्या पाठपुराव्यामुळे गेली १५ वर्षे प्रभाग ७ चा विकास कामांचा आलेख चढताच राहिला आहे, अशी प्रतिक्रिया सौ. करलकर यांनी दिली आहे.

प्रभाग ७ मध्ये बसस्थानक दलितवस्ती रुंदीकरण करणे व प्लेवरब्लॉक बसविणे १५,८१,३५९ रुपये, हॉटेल महाराजा ते दलितवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे – २३,६७,९९६ रुपये या कामांचे दोन दिवसांपूर्वीच भूमिपूजन झाले आहे. याशिवाय भरड येथील पार्किंग व्यवस्था – ३४ लाख, पूर्ण झालेला देऊळवाडा स्मशान ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता ६२ लाख, रामेश्वर मंदिर मागील रस्ता कॉक्रीटीकरण व मजबूतीकरण करणे १३ लाख, रामेश्वर मंदिर ते पुलापर्यंतचे कॉक्रीटीकरण ३.२५ लाख, सातेरी मंदिर व रामेश्वर मंदिर खालील वहाळावरील पाणी साठवण्याचे कायमस्वरूपी बंधारे २७ लाख, व सध्या टेंडर प्रोसिजर झालेला करलकर घरानजीकच्या गणेश कोंडीचे सुशोभीकरण करणे – १३ लाख व रानडे घरानजीकच्या पाणंदीचे काँक्रीटीकरण करणे १,७८,००० या कामांचा समावेश आहे. ही कामे २०१६ ते २०२१ मध्ये झालेली आहेत. सततच्या पाठपुराव्यामुळे या कामांना चालना मिळाली असून अन्य कामेही प्रभागात प्रस्तावित आहेत, अशी माहिती नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!