कुणाल सादये मारहाण प्रकरणाच्या तपासात पोलिसांचे ‘असहकार्य’ ; सर्जेकोट ग्रामस्थ जनआंदोलनाच्या पवित्र्यात…

जखमी युवक गोवा बांबूळीत मरणाच्या दारात असतानाही पोलिसांकडून मामाची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार

पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा गाव बैठकीत एकमुखी निर्णय

मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या तरूणाला हडी कांदळगाव रस्त्यावर जबर मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १० ते १५ दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या त्याच्या मामाची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. गेले पंधरा दिवस कुणाल हा जीवन मरणाच्या दारात असून गोवा बांबुळी मेडिकल कॉलेजमध्ये अतिदक्षता विभागात कोमात गेल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबियांचा तो कर्ता असल्याने त्याच्या आई-वडीलांना मोठा आघात झाला आहे. याबद्दल मालवण पोलीसांची भूमीका सहकार्याची नसल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार देण्याचा एकमुखी निर्णय गुरूवारी सायंकाळी सर्जेकोट येथील मारूती मंदिरात आयोजित पंचक्रोशीच्या गाव बैठकीत घेण्यात आली. तसेच पोलीसांकडून योग्य तपास न झाल्यास जनआंदोलन उभे करण्याचेही ठरविण्यात आले.

या बैठकीला सरपंच सौ. नीलिमा परुळेकर, सुनील खवणेकर, कृष्णनाथ तांडेल, दाजी कोळंबकर, शैलेश खांडाळेकर, नाना अंकुश सावजी, नरहरी जामसंडेकर, प्रसाद पाटील, नारायण आडकर, मनीष खडपकर, दाजी खडपकर, मिलिंद तेली, नितीन परुळेकर, नानू करवाडकर, संदीप शेलटकर, संतोष शेलटकर, राजू जामसंडेकर, नाना पराडकर, बाबू आरोलकर, बाबी जामसंडेकर, किसन आचरेकर, सदा खडपकर, जनार्दन आजगांवकर, वैभव आजगांवकर, विलास आडकर, वसंत आडकर, बबन जामसंडेकर, प्रथमेश लाड, परेश फोंडबा, काशिनाथ पराडकर, कांतू देऊलकर, संतोष जामसंडेकर, विकास परुळेकर, संजय जामसंडेकर, अक्षय जामसंडेकर, चेतन खडपकर, आनंद कोयंडे, बाबल गिरकर, भाई पराडकर, लवू सवाजी, गोपळ आडकर, दर्शन सवाजी, भालचंद्र पराडकर, वैभव आजगांवकर, विलास आडकर, महेश आडकर, श्रीराम जामसंडेकर, किसन आचारेकर, पांडू सावजी, अभिषेक पडवळ, दाजी खडपकर, वृषभ आजगांवकर, दिपक जामसंडेकर, जयवंत केळूसकर, सुहास आडकर, दाजी खडपकर, साहिल जाधव, अवधूत आडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कुणाल याच्या मोबाईलवर एक फोन आल्यानंतर तो घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याला हडी ते कांदळगाव या परिसरात बेदम मारहाण करण्यात आली होती. यामुळे त्याला त्या दिवशी आलेल्या मोबाईलवरील फोन नंबरची चौकशी केल्यास संपूर्ण घटनेचा उलगडा होवू शकणार आहे. यासाठी वारंवार पोलीसांना माहिती देऊनही सहकार्य होत नसल्याने आज ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

कुणाल याला मारहाण करण्यासाठी काही युवकांचा सहभाग असल्याने मोबाईलचा डाटा मिळविल्यास तपासात यश मिळू शकणार आहे. मात्र यासाठी पोलीस यंत्रणा गांभिर्याने घेत नसल्याबद्दल ग्रामस्थ अधिकच नाराज आहेत.कुणाल नागोजी सादये यांच्यावर प्राणघातक हल्ला १० ते १५ दिवसा पूर्वी झालेला होता. त्या संदर्भात सदर मुलाच्या मामाने काही ग्रामस्थांसोबत २७ जून रोजी मालवण पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंदणी साठी गेले असता, तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर वारंवार पोलीसांशी संपर्क साधूनही कोणतीच कार्यवाही पर्यंत करण्यात आलेली नाही. मालवण पोलीस स्टेशन काहीच कार्यवाही करत नसल्याने सर्व ग्रामस्थ, पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन या प – करणात व्यक्तीशहा लक्ष्य घालून, पीडित तरुणांस न्यायाची मागणी करण्याचे निश्चीत करण्यात आले.

पालकमंत्री, आमदार यांचे लक्ष वेधणार

सदर मुलगा हा एका गरीब गाबीत समाजाचा आहे. तसेच पीडित मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने याविषयी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी यात लक्ष्य द्यावे आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच पोलीस यंत्रणेकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल हा विषय विधानसभेत पावसाळी अधिवेशनात घेण्यासाठी आग्रह धरण्याचीही विनंती करण्यात येणार असत्याचेही निश्चीत करण्यात आले. अजून पोलीस तक्रार दाखल करून न घेतल्याने, तसेच पुढील तपासास गती न दिल्याने आणि सदर मुलाचे काही कमी जास्त झाले तर त्यास प्रशासनास जबाबदार धरले जाईल. मुलाची प्रकृती चिंताजनक असून गेले १०-१२ दिवस तो कोमात आहे. त्याला न्याय मिळण्यासाठी सर्जेकोट, मिर्याबांद, कोळंब, पंचक्रोशी येथील सर्व ग्रामस्थ आणि संपूर्ण गाबीत समाज जनआंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!