मालवणात मनसेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले

मालवण : कोकणातील गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण शाखेने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज, २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आणि मालवण शहरातील मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.

मालवण पिंपळपार ते मालवण बसस्थानक या प्रमुख मार्गावर निर्माण झालेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची वाहतूक सुरक्षितपणे व्हावी, या उद्देशाने मनसेने हा उपक्रम राबविला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम केले. कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रस्त्याची सुरक्षितता आणि नागरिकांची सोय याला प्राधान्य दिले. दरम्यान, हा उपक्रम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली.

error: Content is protected !!