कुडाळ : नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहरप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालय व तुळसुली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये सायकलचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची व्यवस्था उभी राहावी या हेतूने डिगस माध्यमिक विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.