उत्तराखंड येथील वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी पत्रकार संदीप बोडवे आणि ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड

मालवण : येथील पत्रकार संदीप बोडवे आणि ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.

२४ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य विषय आहे – “वन आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक व विज्ञानाची भूमिका”. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून ३१ निवडक प्रतिनिधींची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धनावर सातत्याने वृत्तपत्रातून लिहिणारे पत्रकार संदीप बोडवे आणि विविध सामाजिक संघटनांच्या उपक्रमांत सदैव सक्रिय असलेले ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.या शिबिरादरम्यान वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, नागरिकांचा सहभाग, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण यावर सखोल चर्चा व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या यशामुळे मालवण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, स्थानिक युवक-युवतींसाठी ही प्रेरणादायी बाब ठरणार आहे. या निवडीबद्दल संदीप बोडवे आणि ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!