महेश इंगळे यांनी प्रथमेश इंगळे व मित्र परिवारासह घेतले कणकवली येथील भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी कोकण दौर्‍यावर प्रथमेश इंगळे व मित्र परिसरासह कणकवली येथील श्री भालचंद्र महाराज आश्रमास भेट देऊन श्री भालचंद्र महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री भालचंद्र महाराज मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, अध्यक्ष प्रभाकर राणे, कोकण कट्टयाचे कुमार पितळे, महेश इंगळे मित्र परिवार सदस्य ज्ञानेश्वर भोसले, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, अंकूश केत, मेजर अमोल माने, मनोज इंगुले, सुनिल पवार, नंदकुमार कटारे, रामलिंगय्या स्वामी, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, कुमार हत्तूरे, रमेश शिंदे सर, स्वप्निल गायकवाड, सुरेश वाले, बाबा सुरवसे, संदीप पंडीत, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, महेश मस्कले, लखन सुरवसे, अरूण शिंदे, बंटी नारायणकर, शंकर मलवे आदींसह अन्य उपस्थित सदस्य व भाविक भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!