युवा नेते दीपक सांडव, सौ. रूपा सांडव यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात भारतीय जनता पार्टीने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. युवा नेते दीपक सांडव, सौ. रूपा सांडव यांच्या नेतृत्वाखाली राठिवडे गावच्या सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच निखील जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, गावप्रमूख संतोष धुरी, सदस्य दिपाली धुरी, नारायण जाधव, प्रमोद कदम, प्रदीप धुरी, देवानंद धुरी, प्रकाश मेस्त्री, सचिन पुजारे, गणेश धुरी, विलास पुजारे, संतोष धुरी, सचिन धुरी व इतर ग्रामस्थांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, सरचिटणीस रणजित देसाई, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, उपाध्यक्ष रघुनाथ धुरी, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, शक्तीकेंद्र प्रमुख राजेश तांबे, प्रविण घाडीगांवकर, दया हाटले, अरुण परब, बुथ अध्यक्ष प्रकाश खांबल, गुरुदास पांचाळ, किंजवडेकर, गणेश सचिन, दिलीप घाडीगांवकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.