सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी मालवण बंदर जेटी येथे भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा

विजेत्या स्पर्धकाला १ लाख ११ हजार १११ व आकर्षक चषक तर उपविजेत्या स्पर्धकाला ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक मिळणार : तृतीय व चतुर्थ क्रमांकासह अन्य अन्य आकर्षक बक्षिसे

मालवण : सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

तर स्पर्धेतील तृतीय क्रमांक १५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघास व उत्कृष्ट प्रहार यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून आकर्षक चषक असणार आहे. सर्व स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण असणार आहे. अधिक माहितीसाठी संजय घरत 7798998949, सागर तिगडी 8082124212, सतीश आचरेकर 9923823769, आनंद आचरेकर 9325201375 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!