श्रावणधारा महोत्सवाअंतर्गत उपक्रम ; १९ ऑगस्ट पर्यंत चालणार कार्यक्रम


मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २९ जुलै पासून भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव सुरु आहे. या अंतर्गत मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी नामांकित भजनी बुवांची भजन सेवा होणार आहे. श्रावणधारा महोत्सवाचे यंदा ११ वे वर्ष आहे. हा महोत्सव १९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

१२ ऑगस्टला सायं. ७ वा. श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी मालवण (बुवा – भालचंद्र केळुसकर) तर रात्रौ ८.३० वा. श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडुप मुंबई. (बुवा – भगवान लोकरे) यांची भजने होणार आहेत. तर गुरुवार दि. १४ ऑगस्ट सकाळी ८ वा. लघुरुद्र, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. संयुक्त दशावतारांचा दणदणीत संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग “कालचक्र” होणार आहे. यात कलाकार गणपती- काका कलिंगण, रिद्धी सिद्धी – योगेश वस्त, देवराज इंद्र- बबलु मेस्त्री, यमधर्म- दादा राणेकोनस्कर, राजा सुशील- विलास तेंडुलकर, राणी उर्वी- संजय लाड, अधमासूर – पिट्या दळवी, नारद सुभाष लोंडे, शंकर- उदय राणेकोनस्कर, राजकन्या धुती- यश जळवी, यती – उल्हास नाईक, ब्राम्हण- काका कलिंगण, माळी – सुधीर देवळी यांचा समावेश आहे. त्यांना संगितसाथ हार्मोनियम आशिष तवटे, मृदूंग चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण देणार आहेत. तर विशेष सहाय्य – लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर. यांचे लाभणार आहे.
















Subscribe to my channel




