अबब… घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १५० रुपयांची वाढ

मालवण : बातमी आहे महागाईच्या आगीत आणखी तेल ओतणारी. गेल्या आठ महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये १५० रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता सर्वसामान्यांना ८७० रुपये इतकी महागडी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडून गेले आहे.

कोरोना काळात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचा खिसा आधीच खाली झाला आहे. त्यात पेट्रोलियम पंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर दरात सातत्याने वाढ केली जात आहे. गेले दीड वर्ष प्रति सिलिंडर मिळणारे अनुदानही देणे बंद केल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा भडका सोसावा लागत आहे. मंगळवारपासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर २५ रुपयांनी दरवाढ लागू झालेली आहे. जानेवारी महिन्यात ७०३ रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरसाठी ऑगस्ट महिन्यात ८६८ रुपये मोजावे लागत आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत सहा वेळा दरवाढ करण्यात आली आहे.

जानेवारी : ₹ ७०३
फेब्रुवारी : ₹ ८०३
मार्च : ₹ ८२८
एप्रिल : ₹ ८१८
मे : ₹ ८१८
जून : ₹ ८१८
जुलै : ₹ ८४३
ऑगस्ट : ₹ ८६८

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!