अशोक सावंत यांची कर्मचाऱ्यांसमवेत अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक
मालवण : विभागीय कार्यालय कुडाळ लेखा विभागाच्या चुकीमुळे महावितरणच्या ठेकेदाराला ओरोस उपविभागचे बील अदा न झाल्याने ठेकेदाराने ओरोस उपविभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार अदा न केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी महावितरणचे कामगार नेते अशोक सावंत यांच्या ही बाब निदर्शनास आणली असता श्री. सावंत यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमवेत आज सकाळी सर्कल ऑफिसला धडक देत कंत्राटी कामगारांची पगारा संदर्भात व्यथा मांडली. यावेळी अधिक्षक अभियंता यांनी या विषयाचे गांभीर्य समजून ठेकेदाराला सर्व कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. अखेर ठेकेदाराने तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. यामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त केले आहे.