मनसेच्या वतीने मालवण तालुक्यातील शाळांमध्ये वह्यावाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम…

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्याच्या वतीने पेंडूर आणि पोईप येथील शाळांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.

मनसे नेते माजी आमदार राजू पाटील आणि डोंबिवली शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्षद पाटील यांच्या सौजन्याने या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम मनसे नेते शिरीष सावंत, संपर्क अध्यक्ष संदीप दळवी आणि जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर’ आणि ‘वर्दम हायस्कूल पोईप’ या दोन्ही प्रशालांमध्ये उत्साहात पार पडला.

मनसे जशी नेहमी अन्यायाविरुद्ध जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, त्याचप्रमाणे अशा शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना नेहमीच हातभार लावत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. या प्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मनसे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल वर्दम हायस्कूल पोईपचे मुख्याध्यापक विकास कुंभार तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे मुख्याध्यापक सुरेश तावडे यांनी मनसेचे विशेष कौतुक केले आणि आभार मानले.

error: Content is protected !!