पत्रकार ते नगरसेवक बनलेल्या विलास कुडाळकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
कुडाळ नगरपंचायती मध्ये भाजप गटनेते पदी नियुक्ती
कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक तथा पत्रकार विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक ऍड. राजीव कुडाळकर, महिला नगरसेविका सौ.प्राजक्ता शिरवलकर, सौ नयना मांजरेकर, कु चांदणी कांबळी तसेच रुपेश कानडे, राकेश नेमळेकर, सचिन तेंडुलकर, सचिन पालकर आदी उपस्थित होते.