मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपने महाविजय मिळवला आहे. या महाविजयाचे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे फायरब्रँड युवा नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यानी भेट घेऊन अभिनंदन केले.
आज संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीचा ऐतिहासिक विजय अनुभवला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत मिळालेले दणदणीत यश हे जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महापालिकांवर भाजप-महायुतीने घवघवीत यश संपादन करत बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामागे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे दूरदृष्टीपूर्ण, ठाम व लोकाभिमुख नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा आज राज्यभर दिसून आला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मी आज प्रत्यक्ष भेट घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यासोबतच, महायुतीतील सर्व प्रमुख घटक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तळागाळातील प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता यांच्या एकजुटीमुळेच हा विजय शक्य झाला आहे. महायुतीच्या या दणदणीत विजयाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन! हा विजय महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा ठाम विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.