आ. वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त रेवतळे फाटक शाळेला साउंडसिस्टीम भेट

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने रेवतळे फाटक शाळेला साउंड सिस्टीम भेट म्हणून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शहरी विभागात असूनही जि. प. च्या फाटक शाळेला विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पाहून समाधान व्यक्त केले.

यावेळी युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेविका शीला गिरकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश मांजरेकर, किसन मांजरेकर, पॉली गिरकर, शिक्षिका रोहिणी देशमुख, सहायक शिक्षिका प्रिया सावंत आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी रेवतळे येथील जिल्हा परिषद शाळेत लक्षणीय उपस्थिती पाहून आनंद व्यक्त केला. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांचा ओढा असताना मराठी माध्यमाच्या या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या उल्लेखनीय असून या शाळेला सर्वतोपरी प्रयत्न केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनीही विचार मांडले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!