चार गावांत माजी आमदार वैभव नाईक यांचा गावभेट दौरा; ग्रामस्थांशी साधला संवाद

नेरूर-कवठी-चेंदवण मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर रोष; जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्येक शिवसैनिकाने आवाज उठवावा – वैभव नाईक

कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी नेरूर जिल्हा परिषद विभागातील कवठी, चेंदवण, वालावल आणि हुमरमळा या गावांचा गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि शिवसैनिकांशी संवाद साधत स्थानिक समस्या, विकासकामे तसेच विविध विषयांवर चर्चा केली. या दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावांमध्ये झालेल्या विविध विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

दरम्यान, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्या अनेक घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः नेरूर-कवठी-चेंदवण हा मुख्य रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक बनला असून, वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी वैभव नाईक यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच युवासेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी चेंदवण युवासेना शाखाप्रमुखपदी नारायण तोरसकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “आज मी आमदार नसलो तरी जनसेवेच्या कामात कधीही खंड पडू दिलेला नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने, मोर्चे आणि विविध माध्यमांतून सातत्याने आवाज उठवत आलो आहे. यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील.”

सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, जनहितापेक्षा स्वतःच्या फायद्याची कामे मंजूर करून घेण्यावर आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यातील जनतेला नको असलेले विनाशकारी प्रकल्प आणले जात असून, परप्रांतीयांना येथील जमिनी मिळवून दिल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांचे अभय असल्यानेच परप्रांतीयांकडून स्थानिकांशी अरेरावी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अदानीचे स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारले जात असून, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारचा धाक नसल्याने गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाने पार पाडली पाहिजे. जनतेच्या प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत आहे, असा विश्वासही वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला.

हुमरमळा येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, माजी सरपंच सुरेश वालावलकर, रमा गाळवणकर, स्नेहलदीप सामंत, शरद वालावलकर, सोनाली मांजरेकर, पंढरी गाळवणकर, नाथा राणे, भिवा गुंजकर, संजना गुंजकर, हेमांगी कद्रेकर, सुमित परब, वैभव मांजरेकर, विजू पेडणेकर, अजित केसरकर, किशोर वालावलकर, पोलीस पाटील सुबोध सावंत, योगेश परब, जयसिंग मार्गी, सागर परब, प्रभाकर गुंजकर, शानो परकर, धनंजय परकर, पप्पू दळवी, संदेश जाधव, रमा मांजरेकर, विजय वालावलकर, नामदेव परब आदी उपस्थित होते.

कवठी येथे अरुण परुळेकर, दिलीप परुळेकर, एकनाथ बांदेकर, मंगेश बांदेकर, नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, संतोष वाडयेकर, राजन खोबरेकर, रवी गोडकर, दीपक सांगळे, समीर बांदेकर, सिद्धिविनायक कवठकर, गणपत कवठकर, संजय खोबरेकर, कुणाल बांदेकर, रुपेश खडपकर, महेश वाडयेकर, मधुकर खडपकर, अशोक खडपकर, गजानन कवठकर आदी उपस्थित होते.

चेंदवण येथे केशव पिळणकर, अंकुश तोरसकर, शंकर जामसाडेकर, रवी तोरसकर, अनंत पिळणकर, रेवती तोरसकर, मदन तोरसकर, भावेश तोरसकर, ओमकार पिळणकर, सगुण तोरसकर, सत्यविजय तोरसकर, सवैश तोरसकर आदी उपस्थित होते. वालावल येथे पूजा राऊळ, शाखाप्रमुख सुनील करवडकर, हेमंत वालावलकर, रवींद्र कावळे, गोविंद पेडणेकर, प्रमोद आडेकर, सागर तेली, राजन वालावलकर, सुनील आडेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!