मालवणात मनसेच्या तालुका कार्यालयाचा उद्या श्रीगणेशा!

मनसेच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गाळा क्रमांक २, फातिमा कॉन्व्हेन्ट समोर, मालवण येथे हे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्यास मनसे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, गजानन राणे, अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मालवण तालुक्यातील विविध सामाजिक, स्थानिक आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी नव्या कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासह नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या उद्घाटन सोहळ्यास मालवणमधील सर्व महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केले आहे.

error: Content is protected !!