१६ व १७ जानेवारीला शिवसेनेच्या शिवसेना कार्यालयात मिळणार अर्ज : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण : येत्या ५ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यातील इच्छूक उमेदवारांकडून शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागवले आहेत. येत्या १६ व १७ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी १ व संध्याकाळी ३ ते ६ पर्यंत शिवसेनेच्या मालवण कार्यालयात हे अर्ज उपलब्ध असतील, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.
मालवण तालुक्यात ६ जि.प. मतदार संघ व १२ पं.स मतदार संघात निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी इच्छुकांसाठी शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचे इच्छुक उमेदवारी फॉर्म पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी इच्छुक उमेदवारी फॉर्म घेणे आवश्यक आहेत. व विहीत वेळेत पुन्हा शिवसेना शाखेत देणे बंधनकारक आहे. तरी इच्छूकांनी शिवसेना मध्यवर्ती शाखा मालवण, मामा वरेरकर नाट्यगृहा समोर, कोर्णाक हॉटेल शेजारी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.