पर्यावरण संवर्धन यात्रेचे आचरा येथे जल्लोषात स्वागत

आचरा : राष्ट्रसेवा दल, सिंधुदुर्गच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० किमी. आयोजित सायकल यात्रेचे आचरा तिठा येथे आचरा सरपंच, व्यापारी संघटना, सानेगुरुजी कथामाला, ग्रामस्थांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देवून जनजागृती करण्यात आली.

यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, सानेगुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, परेश सावंत, अजित घाडी, मांगिरीष सांबारी, विद्यानंद परब, सुगंधा केदार गुरव (उपाध्यक्ष साने गुरूजी कथामाला ), संजय परब, परशुराम गुरव, मनाली फाटक, भावना मुणगेकर, सायली परब, कामिनी ढेकणे आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर यात्रेला शनिवारी सकाळी विजयदुर्ग किल्ल्यापासून सुरूवात करण्यात आली होती. २७ रोजी सकाळी या रॅलीचा गोवा मुक्ती आंदोलन स्मारकाचे ठिकाणी समारोप होणार आहे. या रॅलीत पर्यावरण विषयक जागल्याचे काम करणारे रमेश गावस, सॅबी रॅाड्रीक्स, बाबासाहेब नदाफ, श्यामसुंदर सोन्नर महाराज, सुजित डोंगरे, कुमारकलानंद मणी, नितीन वाळके यांसह अनेक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!