निलेश राणेंच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त शिवसेनेकडून उबाठाला आडवली मालडी विभागात भगदाड

उबाठा विभागप्रमुख बंडू चव्हाण, असगणी सरपंच साक्षी चव्हाण यांच्यासह असगणी, निरोम, ओवळीये, गोठणे गावातील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात कुडाळ मालवणच्या ऐतिहासिक निकालात आमदार निलेश राणे विजयी झाले. या वर्षपूर्तीचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून शिवसेनेने उबाठाला आडवली मालडी विभागात भगदाड पाडले आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा विभागप्रमुख बंडू चव्हाण, असगणी सरपंच साक्षी चव्हाण यांच्यासह असगणी, निरोम, ओवळीये, गोठणे गावातील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आ. राणे यांनी सर्वांचे शिवसेनेच्या परिवारात स्वागत केले.

आडवली मालडी मतदार संघातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी बंडू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरपंच आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कार्यक्रम मालवण येथे आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. हा पक्षप्रवेश म्हणजे आमदार राणे यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षाची भेट असल्याचेही श्री. सामंत म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे शिवसेनेला धक्का देण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख सामंत यांनी जाहीर केले. आता आडवली मालडी मतदार संघात शिवसेनेचीच एकहाती सत्ता आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

यावेळी व्यासपिठावर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, प्राजक्ता शिरवलकर, बाळू कुबल, उमेश नेरूरकर, सुनील घाडीगावकर, विनायक बाईत, विश्वास गावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ठाकरे शिवसेना माजी विभागप्रमुख बंडू चव्हाण, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, सदस्य मनोहर कासले, रामचंद्र राऊत, यशवंत राऊत, विभाग प्रमुख संतोष घाडी, शाखाप्रमुख विनायक राऊत, माजी सरपंच बाबु परब, ओवळीये ग्रामपंचायत सदस्य साक्षी गोसावी, माजी सरपंच अंबाजी सावंत यांच्यासह असंख्य उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी दत्ता सामंत, बाळू कुबल, बबन शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन भाई मांजरेकर यांनी केले.

error: Content is protected !!