मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त ; आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २६  हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्डच्या २० हजार व कोवॅक्सीनच्या ६ हजार  लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.
        गणेशचतुर्थी हा सण काही दिवसांवर असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्येने चाकरमानी दाखल होतात. परंतु कोरोनाचे संकट कायम असल्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर असून मागील आठवड्यात सिंधुदुर्गसाठी त्यांच्या माध्यमातून २० हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला होता. तसेच चार दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी २१ हजार कोविड लसी पुरविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा जिल्ह्यासाठी २६  हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3846

Leave a Reply

error: Content is protected !!