घोडे, चित्ररथ, मर्दानी खेळ, शिमगोत्सव आणि विविध वेशभूषा : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने आयोजन ; फोवकांडा पिंपळ येथे नेत्रदीपक समारोप सोहळा


मालवण : घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने उद्या गुरुवारी ९ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे यंदा २३ वे वर्ष आहे.
दरवर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. दरम्यान, सायंकाळी ७.३० वा. फोवकांडा पिंपळ मालवण येथे कोल्हापूर करवीर येथील मर्दानी खेळ व नेरूर येथील शिमगोत्सव सोहळ्याचे भव्य दिव्य सादरीकरण होणार आहे. नेत्रदीपक असा हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने याही वर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट (पारंपरिक वेशभूषा) असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धकांची भरड दत्त मंदिर येथे स्वागत यात्रेपूर्वी सायंकाळी ४ ते ५ या वेळात उपस्थित राहून नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी अमिता निवेकर : 9923921507, बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421646390,यांच्याशी संपर्क साधावा. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक अमित खोत व भाऊ सामंत यांनी केले आहे.
















Subscribe to my channel




