के.ई.एम. परिसरात हेल्थ कॉरीडोर उभारण्या संदर्भात आ. प्रमोद जठार यांची मुंबईच्या महापौरांशी चर्चा

मुंबई : मुंबईतील के.ई.एम. रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, महात्मा गांधी मेमोरियल कामगार रुग्णालय, ग्लोबल हॉस्पिटल या महत्त्वाच्या रुग्णालय परिसरात ‘हेल्थ कॉरिडॉर’ उभारण्याचा विषय भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी गुरुवारी विधानपरिषद सभागृहात मांडल्यानंतर या उपक्रमाला गती मिळत आहे.

या विषयाची तातडीची दखल घेत राज्यमंत्री आरोग्य, गृहनिर्माण पंकज भोईर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व आदेश दिले आहेत. तसेच या कामाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आज आ. जठार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची भेट घेऊन महानगरपालिकेमार्फत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ व कार्यक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा हेल्थ कॉरिडॉर महत्त्वाचा टप्पा ठरेल. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा, अशी अपेक्षा आ. प्रमोद जठार यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!