आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

R : आभाळमाया ग्रुपच्या वतीने कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती लावत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. या शिबिराला २५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन रक्तदानासारखा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमासाठी माझे सहकार्य यापुढेही कायम राहील. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या कामातून वेळ काढून समाजासाठी काहीतरी करण्याची भावना महत्त्वाची आहे. आभाळमाया ग्रुप ही सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने असे उपक्रम राबवत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी रक्तदाते, आयोजक तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. विशेषतः आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे, सुनील नाईक, गणेश मोरजकर, उद्योजक बी. जी. गावडे, पेंडूर विभागप्रमुख शिवा भोजने, कट्टा शाखाप्रमुख बाबल गावडे, युवासेना सुकळवाड विभागप्रमुख प्रणय मयेकर, रामचंद्र आंबेरकर (प्यारी), मंगेश फाले, उपविभागप्रमुख समीर लाड, बाळा मसुरकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!