कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पाऊस ?
शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता
मुंबई : राज्यात वातावरणात बदल झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
१२ ते १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुण्यासह मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडले, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर आणि अकोला येथे पाऱ्यात घट झाली आहे. गेल्या दोन दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.