चिमुकल्यांच्या निरागस प्रेमाने आमदार प्रमोद जठार भारावले!

राधानगरीतील शाळेत दसऱ्यानिमित्त सोन्याची पाने देत विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा

राधानगरी : पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी सरवडे येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रेमाने सोन्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या निरागस कृतीने जठार भारावले.

विजयादशमी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील चिमुकल्यांनी उत्साहाने सोन्याची पाने देत शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद, त्यांच्यातील आपुलकी आणि प्रेम यामुळे हा क्षण प्रमोद जठार यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. चिमुकल्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच दसऱ्याची खरी भेट! अशा भावना व्यक्त करत जठार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रचाराच्या धावपळीत विद्यार्थ्यांनी दिलेला हा जिव्हाळ्याचा अनुभव त्यांच्या मनाला भावून गेला. विद्यार्थ्यांचे निरागस प्रेम, संस्कार आणि सणांमधून जपली जाणारी आपुलकी यांचा सुंदर प्रत्यय या भेटीतून आला.

error: Content is protected !!