

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले नेतृत्व ;:मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ? वैभव नाईक यांचा सवाल
मालवण : कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात आज कणकवलीमध्ये आंदोलन छेडण्यात आले. कणकवली एसटी स्टॅन्ड ते पटवर्धन चौकापर्यंत पायी चालत जात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो! रद्द करा, रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा!, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत! अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस सिलेंडरची दरवाढ केली आहे. महागाईमुळे सामान्य लोकांचे कंबरडे मोडले असून दरवाढीचा निषेध करण्यासाठी आणि दरवाढ रोखण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी मोदी सरकारने देशात विरोधक शिल्लक ठेवले नाहीत.जर आज आपण आवाज उठविला नाही तर मोदी सरकार पेट्रोल, डिझेल मध्ये अजून १५ ते २० रुपये दरवाढ करणार आहे. एकीकडे पंतप्रधान मोदीजी सांगतात इंधनाचा वापर कमी करा, परदेशात फिरू नका, परंतु स्वतः ते परदेशात फिरत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री, खासदार, आमदार २५- २५ गाड्या ताफ्यात घेऊन फिरत आहेत. सामान्य जनता मात्र महागाईने होरपळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयात आणि महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे. जेणेकरून पुढची दरवाढ रोखली जाईल. मोदीजींनी अच्छे दिन चे आश्वासन दिले होते, ते कुठे गेले? असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला. पेट्रोल, डिझेल मुळे आता सर्वच वस्तू महाग होणार असून लोकांचा उद्रेक होणार आहे. पुढची दरवाढ रोखण्यासाठी लोकांनी आंदोलनात सहभागी झाले पाहिजे असे वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, तेजस राणे, विलास गुडेकर, अनंत राणे, रोहित राणे, हरकूळ बु. विभागप्रमुख ओमप्रकाश ताम्हाणेकर, कासार्डे विभागप्रमुख तात्या निकम, बाळा नाईक, अजित काणेकर, बबली राणे, नितीन राऊळ, दीपेश परब, अरुण परब, आबू मेस्त्री, योगेश मुंज, चेतन पाटील, फैयाज खान, नीलकंठ राणे, श्रीधर चव्हाण, मारुती चव्हाण, आनंद म्हाडेश्वर, अमित खोचरे, रवींद्र खांदारे, किशोर साबळे, चैतन्य सावंत, अमित इस्वलकर, संतोष चव्हाण, संकेत शिंदे, आप्पा राणे, निलेश परब, स्वप्नील खांदारे, विलास राणे, शुभम परब, श्री. मोहिते, रवींद्र मिरजोळे, जोगी राणे आदी उपस्थित होते.



Subscribe to my channel




