मालवण : सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात दंतचिकित्सक डॉ. जुई देसाई यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची निगा, स्वच्छता आणि नियमित दंतकाळजी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक सवयींबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळा व पालकांकडून कौतुक करण्यात आले.