मालवण दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशकर्त्या महेश कोयंडे यांना प्रभाग ९ मधून उमेदवारी 

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

२१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार : आमदार निलेश राणे

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत अनेक पक्षप्रवेश सातत्याने शिवसेनेत होत आहेत. मालवण नगरपरिषद प्रभाग ९ दांडी येथील महेश अशोक कोयंडे यांसह परिसरातील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. मालवण शहराचा गतिमान विकास होत असताना निधी कमी पडू देणार नाही. नगरविकासच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार असल्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, संघटक राजू बिडये, मोहन वराडकर, जगदीश खराडे, घन:शाम जोशी, अभि गावडे, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, सचिन मोर्वेकर, निकीत वराडकर, मंदार लुडबे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे हे राणे साहेबांप्रमाणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. वर्षभरात मोठा विकासनिधी त्यांनी मतदार संघात आणला. विधानसभेतील त्यांची मुद्देसूद भाषणे गाजली. विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जनतेने अनुभवली. मालवण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी निधी आणला. नळपाणी योजना आणली. विकासाची ही गती आगामी काळात अशीच सुरु राहील. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी दांडी येथील महेश अशोक कोयंडे यांसह दांडी परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात मुकुंद आचरेकर, हेमराज रोगे, मकरंद खवणेकर, चेतन जोशी, विष्णु जोशी, नानू रोगे, आनंद आचरेकर, गिरीधर आचरेकर, दत्ताराम जाधव, सदाशिव रोगे, धोंडी लोणे, बाबू जोशी, रविंद्र केळूसकर, सुरेश सनये, विलास लोणे, महेंद्र कोयंडे, ज्ञानदेव केळूसकर, हरिदास रोगे, अरविंद आचरेकर, यशवंत खवणेकर, संजय रोगे, किरण हुर्नेकर, विजय जोशी, नूतन रोगे, रसिका येरागी, मानसी कोयंडे, समीरा कोयंडे, मृणाल कोयंडे, ईश्वरी जोशी, जलवंती लोणे, नम्रता जोशी, योगिता जोशी, शितल रोगे, सुजाता रोगे, रीना मालंडकर, आर्या कुबल, चंद्रकला जाधव, मनिषा आचरेकर, हर्षदा रोगे, गायत्री रोगे, रुवी आडकर, तिलोत्तमा लोणे, दर्शना सादये, सुषमा जोशी, भारती रोगे, सीताबाई परब, गीता मसुरकर, गुलाब आचरेकर, विद्या जोशी, राधा आचरेकर, निलम लोणे, सुलभा खवणेकर, यमुना आचरेकर, गीता आचरेकर यांसह अन्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!