शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५ -२६ करता नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ८ विकासकामाना मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर विकास कामांमध्ये चिवला बीच धुरीवाडा कुरण ते नीलरत्न बंगला पर्यंत पथदीप बसविणे. (१० लाख), मालवण दांडी खराडे मार्ग ते सामंत रीसोर्ट पर्यंत संरक्षणभिंत आणि रस्ता दुभाजक व्हाळी करून बांधकाम करणे. (१० लाख), चिवला बीच नीलरत्न बंगला ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (२५ लाख), चिवला बीच कुरण ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (२५ लाख), मालवण शहर पिंपळपार लौकिक हॉटेल ते मौनीनाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत अस्तित्वातील गटारावर लादी बसविणे. (२५ लाख), मालवण शहर फोवकाडा पिंपळपार येथे सेल्फी पॉईंट उभारणे व कारंजा पूर्ववत सुरु करणे. (२० लाख), मालवण शहर बसस्थानक परिसर मध्ये ऐतिहासिक पॉईंट उभारणे. (१० लाख), देऊळवाडा येथे अद्ययावत गणेश घाट बांधणे. (१० लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.