आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही पाठपुरावा : तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची माहिती
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय योजनेतून कुडाळ, मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी २ कोटी ४७ लाख ४८ हजारांचा निधी मालवण तालुक्यातील तीन प्रमुख रस्ता कामांसाठी मंजूर झाला असून त्याची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून ही कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी दिली आहे.
निविदा प्रक्रिया केलेल्या कामांमध्ये वायरी, तारकर्ली, देवबाग समुद्र चौपाटी पर्यंत रस्ता प्रजिमा २८ रस्ता सुधारणा करणे. रक्कम ८२ लाख ९९ हजार, कावा, वडाचापाट, नांदोस आणि कुसरावे, पेंडूर, नेरूर पर्यंत रस्ता प्रजिमा 34 या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम ८२ लाख ६९ हजार, असरोंडी ते ओसरगांव प्रजिमा 29 रस्ता सुधारणा करणे रक्कम ८१.८० या तीन कामांची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. रस्ता कामे मंजूर केल्या बाबत आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे तसेच या कामांबाबत पाठपुरावा करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी आभार मानले आहेत.