मालवण बाजारपेठेतील “त्या” धोकादायक इमारतीचा स्लॅब पुन्हा कोसळतोय 

नगरपालिका प्रशासन निद्रावस्थेत, मुख्याधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी घेतली नगराध्यक्षांची भेट ; हस्तक्षेप करण्याची मागणी

मालवण : मालवणच्या मुख्य बाजारपेठेतील धोकादायक असलेल्या सरस्वती सदन या इमारतीचा आणखी काही भाग काल (सोमवारी) कोसळला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही  इमारत गेली चार ते पाच वर्ष धोकादायक स्थितीत असून २०२२ पासून नगरपालिका वारंवार या इमारतीला धोकादायक असल्याच्या नोटीसा देत आहे. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असताना देखील नगरपालिका प्रशासन निद्रावस्थेत आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून या इमारतीकडे दुर्लक्ष होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मंगळवारी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

जागा मालक सदानंद मयेकर हे ही धोकादायक इमारत स्वखर्चाने पाडण्यासाठी तयार आहेत. मात्र काही भाडोत्रीनी येथे बळजबरी कब्जा केला असून नगरपालिकेच्या नोटीसीना केराची टोपली दाखवत इमारतीचा वापर सुरु ठेवला आहे. तरी देखील नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १५ दिवसांपूर्वी या इमारतीच्या स्लॅब चा तुकडा खाली पडल्याने दुर्घटना घडली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा इकडचा स्लॅब कोसळला असून नगरपालिकेने तात्काळ या इमारतीचा वापर बंद करावा, अशी मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे केली आहे. 

error: Content is protected !!