NHM कर्मचारी आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; समायोजन प्रक्रियेसाठी मानले आभार

मालवण  : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची आज मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी  सदिच्छा भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण व्यक्त केले. 

उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन सुरुवात केलेल्या समायोजनाच्या प्रकियेस आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नांनी तसेच आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून प्रयत्नातून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 15 ते 20 वर्षाच्या आरोग्य सेवेनंतर उज्ज्वल भविष्य मिळाले. हे ऋण कर्मचारी कधीही विसरणार नाहीत. असे सांगत कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व महायुती सरकारचे आभार मानले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह पदाधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, दिनार पडते, रश्मी सोहनी, सचिन परब, मनोज मालाडकर, डॉ.अनिरुद्ध मेहंदळे, भारती सावंत, रेश्मा पटेल, स्नेहा सावंत, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सायली नाईक, शीतल खरात, रेश्मा मयेकर, गीतांजली पालव, ज्योती मराळ, सुविधा प्रभू, वेंगुर्लेकर, मूननकर, लीना अलमेडा यांसह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!