जय हनुमान कट्टा ठरला आभाळमाया चषकाचा मानकरी; साई माऊली तिरवडे उपविजेता

आभाळमाया ग्रुपची सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित; इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेल्या प्रिया पेंडूरकरला आर्थिक मदत

कट्टा : कट्टा-कारणेवाडीच्या मैदानावर तीन दिवस रंगलेल्या ‘आभाळमाया चषक २०२६’ या पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात जय हनुमान कट्टा संघाने विजेतेपदावर नाव कोरले, तर साई माऊली तिरवडे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्रिकेटच्या थरारासोबतच विविध सामाजिक उपक्रमांची जोड देत ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

आभाळमाया ग्रुपने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेल्या काळसे गावची कन्या कु. प्रिया विलास पेंडूरकर हिचा विशेष सन्मान केला. तिला शैक्षणिक किट, शाल, सन्मानपत्र तसेच ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.

आभाळमाया ग्रुपच्या ‘वृक्षारोपण’ या संकल्पनेनुसार स्पर्धेला उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंना प्रत्येकी एक झाड देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रुपने सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल विभागाचा उत्कृष्ट महसूल सेवक पुरस्कार मिळविल्याबद्दल वराड गावचे सुपुत्र श्री. योगेश लक्ष्मण वेंगुर्लेकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मालवण तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. ललित ढोलम यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते प्ले बॉईज मालवण विरुद्ध कट्टा पंचक्रोशी क्रिकेट संघ यांच्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंच्या सामन्याचे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मालवण संघाने बाजी मारली.

स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती श्री. संतोष साटविलकर, उद्योजक बिजेंद्र गावडे, युवा उद्योजक अर्जुन विजय चिंदरकर, हॉटेल अतिथी बांबूचे मालक श्री. संजय गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. सुनील नाईक, वरची गुरामवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री. शेखर पेणकर, उपसरपंच आबा कामतेकर, तिरवडेचे उपसरपंच श्री. सुशील गावडे, पेंडूरचे उपसरपंच श्री. सुमित सावंत, वराडचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. विनोद आळवे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. छोटू ढोलम, संदीप सरमळकर, नारायण चिंदरकर, योगेश कामतेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यावेळी उद्योजक मनीष ढोलम, आशिष ढोलम, समीर रावले, संतोष परब गुरुजी, विद्याधर चिंदरकर, युवा नेते शुभम मसुरेकर, बाळू वराडकर, जगदीश परब, डॉ. प्रथमेश वालावलकर, राजन माणगावकर, प्रदीप मिठबावकर, प्रवीण मिठबावकर, अमित आर्ट्सचे मालक अमित चव्हाण, जयंद्रथ परब, कुणाल फाटक तसेच रीलस्टार मालवणी कांडेचोर मयेकर आणि लारा मयेकर आदी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य मंदार मठकर, तुषार सपकाळ, गौरव हिर्लेकर, मकरंद सावंत, अक्षय गावडे, सिद्धू पेणकर, गणेश मोरजकर, प्रजेश रावले, दीपक कवठणकर, राहुल डगरे, प्रणेश ढोलम, रामचंद्र आंबेरकर, प्रणित चव्हाण, प्रवेश यादव, परेश घोगळे, भाई वेंगुर्लेकर, श्रीकांत चव्हाण, विघ्नेश दळवी, शिवा शिरोडकर आणि देवदास ढोलम यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!