Category कोकण

तारकर्ली जेटीच्या आधुनिकीकरणासाठी ४.९७ कोटींचा निधी मंजूर

रो-रो बोट सेवेसाठी मोठे पाऊल; निविदा प्रक्रिया जारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या घोषणेला गती, आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश! शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी मानले आभार मालवण : सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेसाठी आता…

मंत्री नितेश राणेंच्या कठोर भूमिकेचा दणका ; महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणारी कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!

दोनदा हुलकावणी देणाऱ्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले; तांडेलसह सात खलाशी जाळ्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या…

कट्टा येथे रंगणार श्रीकृष्ण वेशभूषेचा भक्तिमय सोहळा

आभाळमाया ग्रुपतर्फे ९ नोव्हेंबरला ‘सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’ पर्व २ चे आयोजन मालवण : भगवान श्रीकृष्णांच्या मनमोहक रूपाचा, बाललीलांचा आणि भक्तिमय संस्कृतीचा जागर करण्यासाठी आभाळमाया ग्रुप कट्टा यांच्या वतीने ‘कट्टा पंचक्रोशी मर्यादित सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६ – पर्व…

धनत्रयोदशीची सुट्टी पुढे ढकलली! सिंधुदुर्गात ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सन २०२६ च्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, धनत्रयोदशीनिमित्त ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता सोमवार,…

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी आमदार प्रमोद जठारांचा पुढाकार!

राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांशी महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई : कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी पुढाकार घेतला आहे. राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी या रेल्वे स्थानकांवर…

महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झालेल्या गीतांजली चव्हाणचा सत्कार

वडिलांच्या निधनानंतरही खचली नाही; दुःखावर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर गाठले यश मालवण : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालणाऱ्या मालवणच्या कन्या कु. गीतांजली चंद्रकांत चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) निवड झाल्याबद्दल…

धो… धो… धो…डाला! शब्दांच्या मैदानात विशाल परब यांची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी विनोद राऊळ आणि ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील मिश्किल भाष्याने हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट! सावंतवाडी : सावंतवाडी येथील शरीरसौष्ठवाच्या मैदानात स्पर्धकांनी आपल्या पीळदार देहयष्टीचे सामर्थ्य दाखविले, मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत भाजपचे…

सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

निर्मला नदीत आंघोळीसाठी उतरला अन् काळाने घातला घाला कुडाळ : मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर काळाने अचानक झडप घातली. माणगाव खोऱ्यातील कालेली-धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या ३३ वर्षीय प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर यांचा पाण्यात बुडून…

विरोधकांच्या आरोपांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकरांकडून पोलखोल!

मालवणच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार; उबाठा गटावर जोरदार निशाणा नळपाणी योजनेसह सर्व विकासप्रकल्प दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध; आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा मालवण : मालवण शहरातील नव्या नळपाणी योजनेसह विविध विकासकामांवरून…

दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; ५.३८ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

८० बॉक्स दारू पोलिसांच्या ताब्यात; तिघांविरोधात गुन्हा दाखल परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिसांची धडक कारवाई मालवण : मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात मालवण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल ५ लाख…

ADVT | भावपूर्ण श्रद्धांजली : प्रथम पुण्यस्मरण (तिथीप्रमाणे)

कै. आप्पासाहेब दादा माने(सेवानिवृत्त गटविकास अधिकारी) देवाज्ञा : १२ ऑक्टोबर २०२५ आपण आम्हाला सोडून जाऊन आज एक वर्ष झाले, तरी आपल्या प्रेमळ आठवणी, संस्कार आणि सहवासाच्या स्मृती आजही आमच्या मनात कायम आहेत. आपली उणीव कधीही भरून न निघणारी आहे. आपल्या…

‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीला रवाना!

मतचोरीविरोधातील लढ्याला पाठिंबा; रामलीला मैदानावरील रॅलीत जिल्हा काँग्रेसचा सहभाग सिंधुदुर्ग : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते…

error: Content is protected !!