Category अपघात

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात; दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू!

दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर-कोल्हापूर-बेळगाव मुख्य मार्गावरील स्नेह रेसिडेन्सीसमोर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरून येणाऱ्या मिनी टेम्पोला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ…

झाडावरील गांजिल माशांचे पोळे बनले काळ; मधमाशांच्या हल्ल्यात जखमी इसमाचा मृत्यू!

तीन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले सावंतवाडी | प्रतिनिधी झाडावरील गांजिल माशांचे पोळे अचानक दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळले आणि संतप्त माशांनी केलेल्या हल्ल्यात एका निष्पाप जीवाचा बळी गेला. माडखोल येथील आनंद हेमा म्हालटकर (वय ५३, रा. म्हालटकरवाडी) यांचा शुक्रवारी दुपारी सावंतवाडी…

सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

निर्मला नदीत आंघोळीसाठी उतरला अन् काळाने घातला घाला कुडाळ : मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर काळाने अचानक झडप घातली. माणगाव खोऱ्यातील कालेली-धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या ३३ वर्षीय प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर यांचा पाण्यात बुडून…

वागदे अपघातातील गंभीर जखमी प्राची मसुरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी

गोव्यातील बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास; दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्राची प्रदीप मसुरकर (वय ३२, रा. हिर्लोक, ता. कुडाळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोव्यातील बांबुळी रुग्णालयात २७ ऑक्टोबर रोजी…

काळाने घात केला! महामार्गावरील भीषण अपघातात भूषण कुडाळकरांचा दुर्दैवी अंत

कुडाळ आंबेडकरनगरवर शोककळा कुडाळ : नियतीचा घाला कधी, कुठे आणि कसा पडेल, याचा नेम नाही! हसतं-खेळतं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्या एका भीषण अपघाताने कुडाळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला…

तारकर्लीतील जळीत बोट दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला वैभव नाईकांचा मदतीचा हात

घटनास्थळी भेट देत केली पाहणी; कांदळगावकर कुटुंबीयांना दिला धीर मालवण : तारकर्ली येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी जळीत बोट दुर्घटनेची गंभीर दखल घेत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेमुळे संकटात…

साटेली-भेडशीतील जखमी कंत्राटी वीज कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी अशोक सावंत आक्रमक

आर्थिक मदतीसाठी महावितरण प्रशासनाला अल्टिमेटम; अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर काम बंद आंदोलनाचा इशारा दोडामार्ग : महावितरणच्या कामादरम्यान विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगार मोहन गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी आक्रमक भूमिका…

तारकर्लीतील आगग्रस्त कांदळगावकर कुटुंबाला भाजपचा दिलासा

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी; नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार मालवण : तारकर्ली वरचीवाडी येथे कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत मासेमारी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला भारतीय जनता पक्षाने दिलासा…

तारकर्लीत रापण संघाच्या कावनाला आग; मच्छीमार कुटुंबाचा संसारच जळाला

आग लावल्याचा संशय; संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला आमदार निलेश राणेंचा धीर, मदतीची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर दिवसरात्र समुद्राशी झुंज देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमाराच्या कष्टांवर एका आगीने क्षणात पाणी फेरले. तारकर्ली वरचीवाडी येथील कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री…

रायगड | दिवेआगरच्या समुद्रकिनारी काळाचा घाला; ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीहून सहलीसाठी आले होते ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक; समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू…

भरधाव दुचाकीची नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्या दुचाकीला धडक

अंजली लॉजसमोरील अपघातात खानोलकर यांच्यासह चौघे जखमी; ग्रामीण रुग्णालयात उपचार तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा गतिरोधक आवश्यक ; अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर मालवण : शहरातील अंजली लॉजसमोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात भाजप नगरसेविका सौ. महानंदा…

ओझर येथे बुलेट-रिक्षाची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

मालवण : मालवण-आचरा मार्गावरील ओझर येथे रविवारी सायंकाळी बुलेट आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (रा. कांदळगाव) आणि रिक्षाचालक…

error: Content is protected !!