Category सिंधुदुर्ग

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याकडून निवडणूक शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती ?

ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मोठा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर कारवाईसाठी लेखी पत्र सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याने निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्र्यांची भेट

महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासह ‘सागरमाला २.०’ अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांबाबत चर्चा नवी दिल्ली : राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.…

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईला जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक, विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद…

Kudal | तन्वीच्या आत्महत्येप्रकरणी नवरा सिद्धिविनायक कुडाळकर याला अटक

कुडाळ : शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (पूर्वाश्रमीच्या सोनाली सुभाष सांगेलकर, वय ३६) हिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिचा नवरा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याच्यावर गुन्हा…

कै. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘कृषिभूषण’ आणि ‘कृषिरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले वेंगुर्ले येथील ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्यांच्या वेंगुर्ले कुबलवाडा येथील निवासस्थानी…

मर्डे ग्रामपंचायतचे नाव बदलून मसुरे मर्डे करा

डॉ. दीपक परब यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी मालवण : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे मर्डे करावे अशी मागणी मसुरे ग्रामविकास संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अलर्ट ; ३.२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

२७ ते २९ जुलै कालावधीत धोका : मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते दि.…

मच्छिमार बांधवांच्या समुद्रातील सुरक्षिततेसाठी मंत्री नितेश राणेंच्या खात्याकडून सॅटेलाईट फोन उपलब्ध 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मच्छिमारांना प्रतिकात्मक स्वरूपात ५ सॅटेलाईट फोनचे वितरण मुंबई : राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात ५ सॅटेलाईट फोनचे…

Malvan | आठवडा बाजार सोमवारपेठेत हलवण्यासाठी व्यापारी आक्रमक : शेकडो व्यापाऱ्यांची नगरपालिकेत धडक

तात्काळ निर्णय द्या, युवा व्यापाऱ्यांची आग्रही मागणी ; अन्यथा मालवणातही “जेन Z” ची ताकद दाखवून देण्याचा इशारा नगरपालिकेच्या सभेत विषय घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्गावर भरणारा सोमवारचा आठवडा…

देवबागात २० वर्षीय हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या 

मालवण : देवबाग येथील एका हॉटेल मध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी कामास आलेल्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड (वय – २०, रा. विजापूर) या कामगाराने हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या फिल्टर रूम बाहेर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.…

सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट

राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल : ‘त्या’ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणा-या उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्‍या महिला अधिका-यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द…

error: Content is protected !!